स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय कराल?
लोकमत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेल्फी विथ इको-फ्रेंडली बाप्पा’ ह्या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होण्यासाठी https://contest.lokmat.com/eco-friendly-bappa-selfie-contest-2023/ या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे दिसणाऱ्या वेबसाईट बॅनरवर क्लिक केल्यावर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, ई-मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा सेल्फी (.jpeg format) अपलोड करा. तुमची प्रवेशिका आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर, स्पर्धेचे नियम आणि निकष यानुसार मान्यवर परीक्षक विजेत्यांची निवड करतील आणि त्यांची नावं जाहीर केली जातील.
स्पर्धेचे नियम आणि अटी:
- ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे .
- स्पर्धा पूर्णत: ऑनलाईन असून https://contest.lokmat.com/eco-friendly-bappa-selfie-contest-2023/ वरूनच या स्पर्धेत सहभागी होता येईल.
- फोटो हा चांगल्या क्वालिटीचा, सुस्पष्ट आणि .jpeg, .png फॉरमॅट मध्येच असावा.
- सेल्फी ओरिजिनल असावा. एडिटेट फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी.
- उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी.
- उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापर असू नये.
- सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य दिले जाईल.
- फोटो अपलोड करताना तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक आहे. विजेत्यांची निवड करताना ही उत्तरंही तपासली जाणार आहेत.
- स्पर्धेशी निगडीत आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्पर्धेच्या संदर्भात आयोजकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला आव्हान देता येणार नाही.
- स्पर्धकांचे फोटो प्रदर्शित करण्याचे आणि भविष्यात त्याचा वापर करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com