सखी म्हणजे मैत्रीण ती आपल्या नवऱ्याची असू शकते,किंवा मुलाची,किंवा वडिलांची ती एक त्यागाची प्रतीक असते ती म्हणजे शक्तीशाली स्त्री,स्वतःचा विचार न करता झटणारी ती आई असते,ती एक बायको असते,ती एक मुलगी असते,ती त्याच प्रतीक असते.लहानच मोठ आई वडील करतात, शिक्षण देतात त्या मुलीला,लग्न झाल्यावर ती नवऱ्याच्या घरी जाते.आपलं सर्वस्व पणाला लाऊन संसार करते मुलबाळ सांभाळून नोकरी करते,सासरच्या मंडळीची मते राखते.ह्यात मूल मोठी होतात.तिला स्वतःसाठी जगणं राहून जाते त्यामुळं कदाचीत सखी ची निर्मिती झाली,आजवर जी स्त्री नेहमीच्या कामातून जरा मोकळी होते आणि स्वतःसाठी जगते या सखी माध्यमातून,त्या आईला,त्या तमाम भगिनींना मनापासून प्रणाम. फक्त एकच सांगणे की आज ही स्त्री सुरक्षित नाही.तिच्यासाठी सर्व समाजाने पाठिंबा दिला पाहिजे,प्रत्येकाने स्वतःचा घरातून संरक्षण दिले तर ती समाजात मनाने राहील.आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषाबरोबर अग्रेसर आहे. उदाहरण.सूनीता विल्यम यांनी 9 महिने अंतराळ मध्ये राहून विक्रम केला.तिच्यातील शक्ती सांगते किती सहनशील स्त्री आहे.प्रत्येकाने स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला पाहिजे.एका चांगल्या भावनेने पाहिले पाहिजे.आज स्त्री आहे म्हणून हे जग आहे,मुलगी असेल तर भ्रूण हत्या करू नये. आज जिजाऊ होती म्हणून तिच्या पोटी शिवबा जन्माला आला.आज आपण आपल्या देशात मनाने जगतो आहे.