Mrs Sarika Kenjale

Sonal Ajay Jadhav


खेळकर आहे खोडकर आहे समजूतदार खुपच आहे हुशार तर आहेच आणि सुंदरता मनाची आहे . सतत बडबड बडबड माझे काम फक्त ऐकून घेणे. पण कायम उत्साही . नव-याला संसारात मदत म्हणून मिळेल ते काम करणारी. अगदी जॅाब पासून ते डबे करण्मंयापर्दियत सर्व कामे जमतात. मंदिरात सेवेला हजर. झाडणे बसकुरे पासुन प्मारसा करायला हजर. माझी सखी जिच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू फुलते. माझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान आहे मला काकू म्हणते. अग नावाने हाक मारत जा म्हणाले तरी नाही ऐकत. वडापाव प्रेमी. तिचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे स्वत: च दुःख कधी दाखवणार नाही.. सतत चेहऱ्यावर हास्य. Motivation कायम .. आपण दोघी एक न एक दिवस बारीक होऊच गं म्हणणारी. चालायच व्यायाम करायला भाग पाडणारी एखादा पदार्थ केला की लगेच रेसिपी सांगणार अजबगजब मैत्रीण आहे.. पण ती आहे म्हणून मी जगा कडे, जिवनाकडे, संसार समाज या सगळ्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघू शकते. जास्त ताण घ्यायचा नाही द्यायचा नाही आनंदी रहायचं हा मंत्र आहे