मी अंकिता प्रितम कुंभार, हाऊस वाइफ आहे, सदर पाठवलेली कविता मी लिहीली, एक छंद म्हणुन मी कविता लिहते. तसेच चित्रकलेची ही आवड आहे, माझे डिप्लोमा इंजिनिअरींग झाले आहे, 8 वर्ष झाली लग्नाला,,लग्नानंतर जॉब ची परवानगी नाही,मिस्टर आर्मी मधे आहेत,दोन मुलांचा सांभाळ करता करता दिवस निघून जातो, पण एक आशा आहे मनात काहीतरी करायचे, विणकाम करण्यात आवड असल्यामुळे घरी राहून लोकरीच्या वस्तू तयार करत असते, पुढे त्याचाच व्यवसाय सुरू करू इच्छिते, माझे पहिले inspiration माझी आई आहे खूप काही शिकले तिच्याकडून. महत्वाचे की ठाम आणि कणखर राहणे, खूप संकटे आली पण हार मानली नाही. जीवनाकडून जे शिकले तेच आता लेखणीतून कागदावर उतरवत असते.. काहीतरी बनायची आस आहे मनामधे, स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास आहे उरामधे, धडपड आहे स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची.. शोधत आहे मार्ग तो,जो ध्येया पर्यंत घेऊन जाईल,,super women कोणी अशीच बनत नाही,, पार पाडाव्या लागतात तिला कित्येक जबाबदाऱ्या आणि अडचणी.. कष्टाचे तिच्या नकोत नुसते गोडवे, दखल घ्यावी तिची एवढेच आहे मागणे,,