*रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनापासून जुळतात...पण नात्याशिवाय न जुळणाऱ्या या रेशमी बंध म्हणजेच ऋणानुबंध ...*
कधीकधी जन्मभर एकत्र राहून सुद्धा नात्यांमध्ये ओलावा रहात नाही आणि कधी कधी एका क्षणाची भेट मनात कायम घर करून रहाते . मुग्धाचे आणि माझे नाते असेच तयार झाले.
*खरं तर बहीण, की माझी जिवाभावाची मैत्रिण?,खरं तर या दोन्ही नात्यांनी आमचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले आहेत.नातं रक्ताचं असलं तरी तिथे ही स्वार्थ दडलेला* *असतो.पण तुमचे-माझे हे हृदयाचे नाते निस्वार्थी भावनेतून निर्माण झाले. याला नाते म्हणावे की पूर्वजन्मीचे ऋणानुबंध?मुग्धा तशी माझ्या मुलांची शाळेतील शिक्षिका .आधी ही ओळख होती आणि आता आम्ही साहित्य क्षेत्रात एकत्र असतो. तिच्या दोन्ही लेकी रिद्धी आणि वेदा अगदी सोनपऱ्या जणू .खूप बोलक्या आहेत दोघीही,मनमिळावू स्वभावाच्या आहेत उत्तम कवयित्री, मनमिळावू स्वभाव ,सदा मदतीस तत्पर,अशा सृजनशील आणि बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व ,सुहास्य वदने ,मितभाषी,सदैव मदतीस तत्पर अशी माझी जिवाभावाची सखी,नेहमी माझ्या सावलीसारखी जवळ असणारी.मला आधार देणारी.म्हणतात ना..मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा...अगदी तशीच आहे माझी सखी मुग्धा.