आपले प्रश्न आपण आम्हाला lokmatonline@gmail.com या ई-मेल वर अथवा +९१ ८२९१२३२३५४ या क्रमांकावर व्हटस् ऍप करू शकता. आम्ही आपली मदत करण्यास तत्पर आहोत
आम्हांला हे सांगायला प्रचंड आनंद होत आहे की या शाॅर्ट फिल्मच्या स्पर्धेतील फिल्मचं परीक्षण करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर सेलिब्रेटींचा आमच्या पॅनेलमध्ये सहभाग आहे. त्यांच्या सिनेमातील आजपर्यंतच्या अनुभवाचा नक्कीच फायदा यातील स्पर्धकांना होणार आहे.
बाॅलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणींच्या भूमिकांमुळे अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री .आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयामुळे तीने मराठी ,हिंदी नव्हे तर तेलगू सिनेसृष्टीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. नोव्हेंबर 1995 मध्ये तिने शांती या मालिकेतून आपल्या छोट्या पडद्यावरील कारर्किदीला सुरूवात केली होती. सी.आय.डी.मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने बालाजी प्रॉडक्शनच्या जोधा अकबर, इतना करो ना मुझे प्यार, के. स्ट्रीट पाली हिल, कवच आणि कसम से यासारख्या नामांकित मालिकांमध्ये काम केले होते.छोट्या पडद्याबरोबरच तिने विविध हिंदी चित्रपटांतही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तीने सिंघम रिटर्न्स, सिंम्बा, ऑल द बेस्टः फन बिगिन्स, अंधाधुन, बदलापूर, अपहरण, खाकी, जॉनी गद्दार आणि गोलमाल या लोकप्रिय बाॅलिवूड सिनेमांत काम केले आहे. श्रीराम राघवन, रोहित शेट्टी, राम गोपाल वर्मा, प्रकाश झा आणि राजकुमार संतोषी यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत तीने काम केले आहे. तसंच अनेक मराठी सिनेमांत तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. तसंच मराठी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिका या गोजिरवाण्या घरातमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसंच फू बाई फू या लोकप्रिय विनोदी रियालीटी शोसाठी तिने जजचं कामही केलं होतं. तिच्या नुकत्याच हुतात्मा मराठी वेब सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.२०११ मध्ये तिने बद्रीनाथबरोबर तेलुगू सिनेमात पदार्पण केले. यानंतर, तिने रक्तचरित्र, निप्पू, मेहबुबा या तेलुगु चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका केल्या. 2019 मध्ये तिने झी 5 वेब सीरिज "चार्जशीट: द शटलकॉक मर्डर" या वेब प्लॅटफॉर्मवर पदापर्ण केलं.
क्रांती रेडकर ही मराठी सिनेमा,नाटक आणि छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2000 साली आलेल्या सून असावी अशी या मराठी सिनेमातून तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या सिनेमात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी होता.
शिक्षणाच्या आयचा घो, मर्डर मिस्ट्री, खो-खो, नो एंट्री अश्या अनेक हिट मराठी चित्रपटात आघाडीची अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या आहेत. 2006 साली आलेल्या जत्रा सिनेमातील तिच्यावर आणि अभिनेता भरत जाधव यांच्यावर चित्रितकरण्यात आलेलं कोंबडी पळाली हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. सध्या ती झी युवावरील मेहफिल या म्युझिक रिअॅलिटी शोची होस्ट आहे. तसेच जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या काकण या सिनेमाचं दिग्दर्शनही तिने केलं आहे.
आदिनाथ कोठारे हा मराठी सिनेमातील एक लोकप्रिय अभिनेता,दिग्दर्शक आहेत. तसंच छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांचा तो निर्माता आहे. आदिनाथ कोठारेने आपले वडिल आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या 1994 साली आलेल्या माझा छकुला या सिनेमात बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. तसंच म्हणून दुभंग, सतरंगी रे,झपाटलेला-2 ,इश्कवाला लव्ह या मराठी सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसंच छोट्या पडद्यावरील त्याच्या 100 या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदिनाथ बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगसोबत कबीर खानच्या आगामी 83 या सिनेमात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या पाणी या सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कांमधील पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट सिनेमा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यशस्वीरित्या अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.