"बाईमाणूस आणि बहिणीत्वाचं बंधन" - दरवर्षी सर्व जण रक्षाबंधन किंवा भाऊबीज खूप उत्साहात साजरी करतात . अगदी लहानपणापासून मी आणि माझी बहीण असंच काहीस नातं राखी न बांधतादेखील जपत आलो आहे. अनेक लोक म्हणतात , अरेरे , तुला सक्खा भाऊ नाही , पण खर सांगायचं तर त्याची कधी गरज हि भासली नाही . आम्ही सख्या बहिणी , आमची एकमेकांचे रक्षण करायची आणि साथ देण्याची जबाबदारी अगदी न चुकता पार पडतो . वेळेप्रसंगी कधी ती मोठी होते तर मी लहान. " बहीण" म्हणजे जणू सावलीच , ह्या नात्याचं खरा अर्थ समजून घेताना "बहीण" आणि "बाईमाणूस" ह्यांच्यामधील अनेक पैलू तुमच्या आयुष्यातील आठवणींचा कप्पा नेहमी भरतच राहतात . माझी बहीण खऱ्या अर्थाने भातुकलीच्या खेळामधील माझी सच्ची सवंगडी, इतर खेळामध्ये कधी चिडीचा डाव खेळताना मला पकडणारी "जासूस" आणि संकटकाळी पाठीशी उभी राहणारी एक आधारस्तंभ आहे . प्रेम ,आपुलकीपणा , चिडणे , रागावणे , मस्क्का लावणे , खोड्या काढणे, लहान असताना आई वडिलांकडे चहाड्या करणे , असं सारंच काही दडलंय माझ्या या "बाईमाणसात" . अगदी काहींना तर आम्ही जुळ्या बहीणी असल्याचं वाटतं. जरी आमच्यामध्ये मी मोठी किंवा ती लहान असली तरीदेखील आम्ही आमचे हे "रोल" परिस्थितीनुसार आलटून - पालटून बदलत असतो.कदाचित आमचं हे विश्वासाचं , बहिणी- बहिणी च नातं राखीच्या "त्या" धाग्याहुन हि अधिक अतूट आणि घट्ट आहे.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com