Hi, मी माझ्या आई बद्दल सांगणार आहे. ती खूपच ग्रेट आहे, ती एक प्रोफेशनल सुपर वुमन आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. तो आज जवळजवळ 20 वर्ष घर आणि नोकरी ही दोन्ही आव्हान लिलया संभाळतेय. माझे वडील सतत फिरतीवर असल्याने माझ्यासकट सगळं घर ती एकटी सांभाळते याशिवाय ती तिच्या ऑफिस च्या CSR मधली एक ऍक्टिव्ह सदस्य आहे. तिने खूप समाजोपयोगी काम केलीये. ती ऑल राउंडर आहे. आजवर मी तिला अनेक रुपात पाहिलं आहे. ती एक चांगली कुक आहे, चांगली चित्रकार, हस्तकलाकार, गार्डनर, टीचर, स्ट्रॉंग ऍक्टर, डान्सर, मॉडेल आहेच नोबल हॉस्पिटल च्या 2018 च्या कॅलेंडरवर ती मॉडेल म्हणून झळकलीय, तीने खूप ब्युटी pajent आणि स्पर्धांमध्ये भाग घेतलाय विशेष म्हणजे ती ज्या स्पर्धांत भाग घेते त्या जिंकूनच येते. ती नोकरी शिवाय प्रोफेशनल जादूगार आणि अँकर ही आहे वाढदिवसाचे आणि तेर शो ही करते. मागे एकदा तिने झोपडपट्टी तील मुलांसाठी ही एक शो केला होता. या शिवाय सौंदर्यस्पर्धांमध्ये ती परीक्षक म्हणूनही आमंत्रित केली जाते. ती तिच्या यशाचं सार श्रेय तिच्या आईला म्हणजे माझ्या आजी ला आणि माझ्या पप्पाला देते. कुठलीही परिस्थिती येऊंदे ती त्याला हसतमुखाने सामोरी जाते आणो निशचित पणे त्यावर उपाय काढतेच. तिला कधीही खचून गेलेलं मी पाहिलं नाही. ती माझ्या घराचा आधारस्तम्भ आहे. माझ्या बाप्पाच्या खांद्याला खांदा लावून तिने आमचं घर सावरून धरलं आहे. मला तिचा खूप खूप अभिमान आहे, त्याहून ही जास्त अभिमान मला तिचा मुलगा असल्याचा आहे. हॅट्स ऑफ मम्मा.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com