व्हॅट्सऍप वर चाट करणारी प्रेमिका भेटेल पण प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायको सारखी प्रेयसी नाही हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही तुमच्या बाईक वर मागे बसून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी बायको सारखी प्रेयसी नाही तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधुंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण कामावरून थकून आल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी बायको सारखी प्रेयसी नाही तुमच्याबरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुम्ही उन्हातून आल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी बायको सारखी प्रेयसी नाही तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही बारा होशील ना लवकर असे म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरून येणारी बायको सारखी प्रेयसी नाही भेटायला यायला तुला किती वेळ लागेल असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबऱ्यात उभी राहून वाट पाहणारी बायको सारखी प्रेयसी नाही
For any queries drop us a mail on contest@lokmat.com